आता पर्यंत आपण मराठी चित्रपट व नाटकं यांच्या व्यावसायिक अपयशाची अनेक कारणे बघितली. त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा इथे मांडावासा वाटतो . तो मुद्दा म्हणजे चित्रपट व नाटक यांची जाहिरात .
एखादा उत्तम दर्जाचा ,चांगला प्रभावी चित्रपट केवळ चांगल्या जाहिराती अभावी फ्लॉप होऊ शकतो . आणि अगदी टाकाऊ वाटणारा चित्रपट केवळ जाहिरात चांगली केल्यामुले हिट होऊ शकतो. एका वाक्यात सांगायचं तर आजच्या युगात ‘जाहिरात’ हि चित्रपट व नाटक यांचं नशीब बदलू शकते .
आता जाहिरात म्हणजे नक्की कशी , ते आधी थोडक्यात पाहूयात :-
जाहिरात अनेक माध्यमांतून करता येते . वर्तमानपत्रं , मासिकं , वगैरे सारख्या माध्यमांतून जाहिरात करणे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा पर्याय सर्वश्रुत आहेच . पण त्याहीपेक्षा प्रभावी पर्याय म्हणजे रेडिओवर जाहिरात करणे. कारण , " आपण जेव्हा एखादी जाहिरात वाचतो ती आपल्या जेवढी लक्षात रहाते त्यापेक्षा ऐकलेली (रेडिओवर) जाहिरात जास्त वेळ लक्षात रहाते."
रेडिओवर जाहिरात देणे :-
महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी रेडियो स्टेशन्स खूप लोकप्रिय आहेत . आपल्याकडे रेडिओची शहरानुसार अनेक केंद्रे आहेत, उदा. पुणे केंद्र , मुंबई केंद्र ,इ . त्याचप्रमाणे खासगी केंद्रे ही आहेत उदा . रेडियो मिर्ची , रेडियो सिटी , इ.
सर्व वयोगटातील लोक ही स्टेशन्स आवर्जून ऐकतात . त्यावरील विविध व मनोरंजक कार्यक्रमांमुळे ख़ास करून युवा वर्ग या स्टेशन्सकडे आकर्षित होतो . त्यामुले रेडियो सारखा जुना पर्याय देखील आजही लोकप्रिय आहे.
विशिष्ट प्रकारची गाण्याची चाल लावून तयार केलेली रेडियो जाहिरात ही जास्त प्रभावी असते. ती लोकांच्या जास्त काळ स्मरणात रहाते . अशा प्रकारच्या जाहिरातीला ‘ रेडियो जिंगल ’ असे म्हणतात . ही जाहिरात रेडिओवर देण्यासाठी, जाहिरात आधी एखाद्या 'जाहिरात कंपनी' कडून ध्वनी स्वरूपात तयार करून घ्यावी लागते. ती साधारण १० सेकंद, १५ सेकंद, ३० सेकंद या वेळेच्या स्वरूपात असते .
अशा प्रकारे जाहिरात तयार करून ती वेगवेगळ्या रेडियो स्टेशन्सवर प्रसारणासाठी द्यावी लागते. एक जाहिरात , रेडियो स्टेशन्स वर एकदा प्रसारीत करण्यास रेडियो स्टेशन्स कमीत कमी ८०० ते १२०० रुपये दर आकारतात . त्यानुसार जर आपल्याला १० सेकंदाची एक जाहिरात दिवसातून १० वेला वाजवायची असेल तर, ८ ते १२ हजार रुपये खर्च येऊ शकतो. जाहिरातीची वेळ (१० सेकंद ) वाढल्यास (१५ ते ३० सेकंद) जाहिरात वाजवण्याचा खर्चहि वाढतो . त्याचप्रमाणे सकाळ , दुपार , संध्याकाळ , रात्र अशा वेळेप्रमाणे जाहिरातीचे दर वेगवेगळे असतात . आणि त्याचबरोबर रेडियो स्टेशन्सच्या लोकप्रियतेनुसार ती रेडियो स्टेशन्स जाहिरातीचे दर कमी-जास्त ठेवू शकतात .
आता आपण जाहिरातीचा सर्वात प्रभावी माध्यम बघूयात, ते म्हणजे टि.व्ही .
जसं, "जेव्हा आपण जाहिरात वाचतो, त्यापेक्षा ऐकलेली जाहिरात जास्त वेळ लक्षात राहते," त्याचप्रमाणे ऐकलेल्या जाहिरातीपेक्षा सुद्धा (टी. व्ही. वर) बघितलेली जाहिरात सर्वात जास्त वेळ लक्षात राहते. कारण आपण ती वाचू शकतो, बघू शकतो आणि ऐकू सुद्धा शकतो.
टी . व्ही. जाहिराती मध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टी. आर. पी . ( टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स ) :- टी. व्ही. च्या क्षेत्रात अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या भाषेतील वाहिन्या असतात. एखाद्या वाहिनीवरील ,एखादा कार्यक्रम किती लोक बघतात यावरून त्या कार्यक्रमाचा टी. आर. पी. काढतात . जेवढा कार्यक्रम जास्त लोकप्रिय , जेवढे लोक तो कार्यक्रम जास्त वेळा बघतील तेवढा त्या कार्यक्रमाचा वा त्या वाहिनीचा टी. आर.पी.
टी. व्ही. जाहिरात तयार करण्याचा खर्च हा कमीतकमी ७० ते ८० हजार पासून ते काही कोटि पर्यंत असू शकतो. सर्वसाधारणपणे एक उत्तम दर्जाची टी.व्ही. जाहिरात तयार करण्याचा खर्च हा दोन ते अडीच लाख असतो . टी.व्ही. जाहिरात ही देखील १० सेकंद, ३० सेकंद, ६० सेकंद अशा वेळेत असते. टी.व्ही. वरील वाहिन्यांवर जाहिरात देण्याचा खर्च हा देखील दर १० सेकंदाला दिड ते दोन लाख रुपये एवढा असतो. लोकप्रिय वाहिनी आणि लोकप्रिय कार्यक्रम यांच्यानुसार हा खर्च वाढून फार तर १० सेकंदाला ५ ते ६ लाख एवढा असतो. टी.व्ही. जाहिरातीत सुद्धा, सकाळ , दुपार, संध्याकाळ, रात्र अशा वेळेनुसार खर्च कमी-जास्त होतो. दिवसाच्या तुलनेत रात्री १२ ते सकाळी ८ या वेळेत जाहिरातीचा खर्च हा कमी असतो.
आता आपण अल्पावधीत प्रचंड प्रमाणात लोकप्रिय झालेलं जाहिरात माध्यम पाहू : इंटरनेट
इंटरनेट जाहिरात :-
जाहिरात क्षेत्रामध्ये टी. व्ही. जाहिरातीच्या तोडीस तोड़ असे माध्यम म्हणजे ' इंटरनेट जाहिरात' . ज्या प्रमाणे टी.व्ही. वरील जाहिरातीला व्यावसायिक भाषेत ‘कमर्शियल ’ असं म्हणतात. तसंच इंटरनेटवरील जाहिरातीला ‘वेबमर्शियल’ असे म्हणतात. इंटरनेटवर जाहिरात करताना बैनर , वेबमर्शियल , यांसारखे बरेचसे नवनवीन आणि मनोरंजक पर्याय उपलब्ध आहेत. आजच्या संगणकयुगात जास्तीत जास्ता तरुण इंटरनेटकडे आकर्षित झालेले आहेत, त्यामुळ इंटरनेट जाहिरातींना टी. व्ही. वरील जाहिरातीच्या तुलनेने थोडासा कमी, परंतु तोडीस तोड़ प्रतिसाद मिळातो.
इंटरनेट वरील जाहिरातीचा खर्च हा कमीत कमी १० हजार ते जास्तीत जास्त ३ लाख असतो. आजकाल बरेचसे चित्रपट निर्माते चित्रपटाची आणि नाटकाची स्वतंत्र वेबसाईट तयार करून घेतात . व त्या वेबसाईट वरून प्रेक्षकांची प्रतिक्रया लगेच मिळू शकते. चित्रपट प्रदर्शनाआधीच प्रसिद्ध करणे , हे या माध्यमामुळे लवकर साध्य होते . लोक तुमच्या वेबसाईट ला भेट देऊन तुमच्या चित्रपटाची छायाचित्रं , माहिती, गाणी ,इ .पाहू शकतात , ऐकू शकतात, डाऊनलोड करून घेऊ शकतात. आपल्या इतर मित्राना वेबसाइटची लिंक पाठवू शकतात. असे इतर बरेचसे पर्याय इंटरनेट जाहिरात माध्यामामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे " खर्च कमी आणि फायदा जास्त " मिळत असल्याने जाहिरातीच्या या माध्यमाचा वापर अलीकडे वाढला आहे. याचा प्रत्येक निर्मात्याने जरूर विचार करावा.
वर्तामानपत्रं, रेडियो, टी.व्ही. आणि इंटरनेट या चारही जाहिरात माध्यामांचा पुरेपुर वापर करून चांगल्या प्रकारची जाहिरात केली तर कुठलाही चित्रपट वा नाटक व्यावसायिक दृष्टया यशस्वी ठरणारच. त्यासाठी चित्रपट आणि नाटक यांच्या निर्मितीचं बजेट ठरवताना जाहिरातीच्या या प्रमुख चार अंगांचा विचार करून त्यासाठी पुरेसा पैसा बाजूला ठेवणे आणि तो नियोजनाबद्ध पद्धतीने खर्च करणे आवश्यक आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

April 12, 2010 at 9:59 AM
Namaskar. Khup chaan ahe ha lekh...Perfect combination of modern and old school of thoughts. Me Pranav Joshi. Netbhet blog ha majha ani Salil cha ahe. Aamhi dar mahinyat 1 e magazine prakashit karto. Hyach sandharbat aaplyashi savistar bolaiche hote. Aapan aapla e mail id kalavlat tar tyavar me aapnas savistar mahiti pathau shakel! majha e mail id ahe pranav@netbhet.com. Dhanyavad
April 12, 2010 at 11:05 PM
April 12, 2010 at 11:15 PM
dhanyavaad ! majha email id aahe : [art4india@gmail.com]