'मराठी चित्रपटसृष्टी आणि तिला आलेली अवकळा ' हा आता चावून चोथा झालेला विषय. त्याबद्दलची कारणमीमांसा करायला सर्व बाजूंनी सुरूवात झालेली दिसते. त्यात थोडी भर म्हणून हा अगदी छोटासा लेख.
सध्या बरेच नवनवीन मराठी तरूण , मराठी चित्रपट निर्मितीमध्ये निरनिराळे प्रयोग करत आहेत, जेणेकरून मराठी चित्रपटांना पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे. सगळ्यांच्या प्रयत्नांना दाद द्यायलाच हवी. कारण खरोखरच काही जण मनापासून चित्रपट करतात. काहींना चित्रपट निर्मितीचा नसता अट्टाहास का आहे कोण जाणे. असो.
आता जे नवनवीन मराठी चित्रपट प्रेक्षक बघतात (?) त्यात त्यांना चित्रपट पहाण्यापासून परावृत्त करणारे बरेचसे मुद्दे आहेत कि ज्यावर चर्चा सुद्धा होताना दिसते आहे. त्यांपैकी एक मुद्दा मी इथे मांडू ईच्छितो , कदाचित आधी ह्या मुद्द्यावर चर्चा झालेली असेल, पण माझ्यासाठी हा नवीन आहे , तो मुद्दा म्हणजे सध्याच्या नवीन मराठी चित्रपटाच्या नट्या आणि नट.

गेल्या ४-५ वर्षांत आलेल्या चित्रपटापासून ते आज-कालच्या , 'साडे माडे तीन' , 'चेकमेट' , इ. इ. पर्यंत सगळ्या चित्रपटांमध्ये असे नट आणि नट्या आहेत ज्यांना सुजाण प्रेक्षक अक्षरशः दररोज टि. व्ही. वरच्या दैनिक मालिकांमध्ये सकाळ-संध्याकाळ पारायणं केल्यासारखं पहात असतात. तेव्हा पुन्हा त्यांनाच घेऊन तुम्ही चित्रपट कसे काय काढता ? चित्रपट काढण्यामागे केवढी स्वप्नं असतात ते मला माहिती आहे, म्हणूनच मला जरा जास्तच आश्चर्य वाटतंय. नवनवीन कलाकार घेऊन चित्रपट काढायला काय होतं ? त्यामुळे नवीन चेहर्यांना संधी मिळेल. मराठी चित्रपटसृष्टीत चांगल्या चांगल्या कलाकारांचा भरणा होईल. जरा मराठी प्रेक्षकांना कमनीय बांध्याच्या युवती आणि पिळदार शरीरयष्टीचे नट बघू देत की. आणखी किती दिवस , सदान् कदा चेहर्यावर बारा वाजलेल्या ,रडारड करणार्या नट्या आणि पोट सुटलेले नट बघायचे त्यांनी ? मराठी तरूण-तरूणींच्या बेडरूम मध्ये, बाथरूम मध्ये, बेडवर , उशीखाली, दरवाजाच्या मागे, वगैरे मराठी नट-नट्यांचे फोटो कधी जाऊन बसणार ? आणि नवीन कलाकारांना चित्रपटात संधी देण्याचा आणखी एक फ़ायदा म्हणजे तुमचे प्रस्थापित कलाकारांना देण्याचे मानधनाचे पैसे वाचतील. कारण नवीन कलाकार प्रस्थापित कलाकारांपेक्षा तुलनेने कमी पैसे घेतात. (तसं पाहिलं तर, प्रस्थापित कलाकारांनादेखील कितपत मानधन मिळतं याबाबतच प्रश्नचिन्ह आहे )राहिला प्रश्न तो हा, की नवीन नवीन कलाकारांना संधी देत गेलं की, प्रस्थापित कलाकारांना कामं कशी मिळणार ?
हा प्रश्न सर्वस्वी कलाकाराने ज्याचा त्याचा सोडवायला हवा , तुम्हाला नक्की कुठलं क्षेत्र निवडायचं ते. एकतर दूरचित्रवाणी मालिका किंवा मग चित्रपट किंवा नाटक. म्हणजे मराठी प्रेक्षक जेव्हा जेव्हा मालिका, नाटक आणि चित्रपट यांचा आस्वाद घ्यायला जाईल, तेव्हा त्याला प्रत्येक क्षेत्रात नवनवीन चेहरे पहायला मिळतील. कंटाळवाणं वाटणार नाही. बॉलीवूड , टॉलीवूड किंवा इतर कोणत्याही प्रांतातील चित्रपटसृष्टीतले कलाकार याबाबत फ़ार चोखंदळ असतात. त्यामुळे ते यशस्वी ठरतात.
मुद्दा जरी लहानसा असला तरी याचा विचार व्हायला हरकत नसावी.

0 Response to "प्रेक्षकांचा धोसरा... तेच तेच नट विसरा !"
Post a Comment