मराठी चित्रपटांना प्रेक्षक नाही, वगैरेच्या चर्चा सध्या कुठे ना कुठे मराठी चित्रपटप्रेमींच्या तोंडून ऐकू यायला लागल्या आहेत. आणि त्याविषयी आधी लिहून झालेलं असल्या कारणाने, आता इथे फ़क्त मराठी चित्रपटाच्या शीर्षकांचाच मुद्दा मांडतो.
आता आपल्याकडे आधीच मराठी चित्रपटांची जगजाहीर अशी दूर्दशा , त्यात विचित्र प्रकारची शीर्षकं कशी काय देतात हे लोक त्यांच्या चित्रपटाला ? गेल्या काही वर्षांत आलेल्या चित्रपटाच्या नावांची यादी पहायला गेलं तर डोकं चक्रावून जाईल :- पांढर, डोह, क्षण, नितळ, सखी, दोघी, धग,निरोप, इ,इ. ..... काय चाललंय हे ? मान्य आहे तुमच्या ह्या समर्पक शीर्षकांचा चित्रपटाच्या कथेशी जवळचा संबंध असतो, पण अशी शीर्षकं ठेवून नाही चालत हल्ली... फ़ारतर फ़िल्म फ़ेस्टीवल्समध्ये दोन-चार पुरस्कार मिळतील तुमच्या चित्रपटाला, बाकी कुणाही सामान्य प्रेक्षकाला कळणारसुद्धा नाही की अमुक अमुक नावाचा चित्रपट मराठीत येऊन गेला म्हणून. जर सामान्य प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचलाच नाही, तर काय उपयोग चित्रपट काढून ? एवढा खर्च करून, कित्येक दिवस उराशी बाळगून असलेलं स्वप्न साकारायची संधी मिळते , ती अशी वाया घालवायची का ?
चित्रपट यशस्वी होण्यासाठी त्याच्या शीर्षकाचाही तितकाच उपयोग असतो. कित्येकदा तर केवळ शीर्षकावर चित्रपट यशस्वी होतात. हिंदीत तर सध्या अंकशास्त्रानुसार चित्रपटांची नावं ठेवायचं फ़ॅड आलंय, करण जोहर आणि राकेश रोशनची ' क' ची बाराखडी तर याचा उत्कृष्ट नमुना आहे. (कुछ कुछ होता है पासून कभी अलविदा ना कहना पर्यंत....... आणि कामचोर पासून क्रीश पर्यंत)
मराठीत तुम्ही असले काही प्रयोग करा अशी कुणाचीही ईच्छा नाही. ( जर अंकशास्त्रावर विश्वास असेल तर प्रयत्न करून पहायला अगदीच काही हरकत नाही घेणार कुणी..)
आता आपल्याकडचे सचिन पिळगांवकर आणि महेश कोठारे यांचं उदाहरण घ्यायला हरकत नाही. या दोघांची उदाहरणं देण्यामागचा उद्देश एवढाच की, दोघांच्या कामाच्या पद्धती निराळ्या असल्या तरी दोघेही यशस्वी आहेत. जर तुम्हाला तुमच्या चित्रपटाच्या नावात अजिबात बदल करायचा नसेल, तुम्ही त्याबद्दल अतिशय ठाम असाल , तर मग तुम्ही तुमच्या चित्रपटात एकतर महेशजींसारखं काहीतरी यू. एस.पी. निर्माण करायला हवं . म्हणजे महेश कोठरेंचा चित्रपट म्हटला कि काही गोष्टी ठरलेल्या असतात, म्हणजे त्याचं शीर्षक पाच अक्षरी च असणार (धूमधडाका , झपाटलेला पासून ते खबरदार, जबरदस्त पर्यंत..) , त्यांचा 'लक्ष्या', त्यांचं स्वतःच नाव 'इन्स्पेक्टर महेश जाधव ', वगैरे वगैरे ... त्यामुळे त्यांच्या चित्रपटाविषयी लोकांना कायमच उत्सुकता असते आणि त्यांचे चित्रपट म्हणूनच यशस्वी ठरतात. (अर्थात् त्यांच्या चित्रपटाची कथा, पटकथा, कलाकारांचा अभिनय वगैरे जमेच्या बाजू असतातच, त्याबद्दल दुमत नाही. पण इथे हे नमूद करण्यामागचा उद्देश हा की चित्रपटाच्या शीर्षकात काही विशेष बदल न करता चित्रपट यशस्वी होतो)
किंवा मग सचिनजींच्या सारखं नेहमी वेगळं आणि आकर्षक शीर्षक ठेवायला हवं. (मायबाप , अशी हि बनवाबनवी , पासून नवरा माझा नवसाचा पर्यंत...) इथे कुठलीही गोष्ट रीपीट नसते, प्रत्येक वेळी सगळं नवं नवं... कथा,पटकथा ,गाणी..... त्यामुळे इथे प्रेक्षकांना कायम उत्सुकता असते कि ह्यावेळेस सचिनजींच्या चित्रपटात काय वेगळं पहायला मिळणार ?

प्रेक्षकांच्या मनात आपल्या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण होणे ह्यात एका दिग्दर्शकाचं फ़ार मोठं यश आहे. आणि म्हणूनच चित्रपटाच्या शीर्षकांचा सुद्धा विचार व्हायला हवा, कारण..... " जर तुम्हीच तुमच्या चित्रपटांना चांगली नावं नाही ठेवलीत, तर मग लोकच तुमच्या चित्रपटांना 'नावं ' ठेवतील. ! "

0 Response to "' नावं ' ठेवायला शिका ..."
Post a Comment