आज नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र चाळताना त्यामध्ये 'पुणे इंटरनॅशनल फ़िल्म फ़ेस्टीवल २००८' ची जाहिरात पाहिली आणि मागच्याच वर्षीच्या ह्याच फ़िल्म फ़ेस्टीवलच्या थरारक आठवणी ताज्या झाल्या......
फ़िल्म फ़ेस्टीवलला जायचं असेल तर ५०० रू. ची डेलिगेट प्रवेशिका विकत घ्यावी लागते , ती घ्यायला म्हणून 'पुणे मॅरेथॉन भवन' मध्ये गेलो सकाळी १० ची वेळ दिलेली होती, पण ११:३० वाजले तरी आम्ही रिकाम्या हातीच होतो.. . त्यांच्यापैकी कुणीही आलेलं नव्हतं, माझ्या सारखेच काही जण लवकर येऊन थांबले होते, शेवटी कसंबसं १२ च्या आसपास प्रवेशिका मिळाली. त्यात सतराशे साठ भानगडी.. विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरीकांना प्रवेशिका रू. ३०० ला मिळते. पण त्यासाठी वयाचा पुरावा दाखवावा लागतो...तिकडे एक आजी बाई होत्या, त्यांच्या वयाच्या पुराव्या वरून तिथे जरा गडबड झाली, त्या म्हणत होत्या की त्यांची साठी ओलांडली आहे म्हणून, पण त्यांच्याकडचा पुरावा जीर्ण झाल्या असल्या कारणाने त्यांना ते सिद्ध करता येत नव्हतं, आणि तिथले स्वयंसेवक त्या आजींना 'साठी'च्या मानायला तयार नव्हते. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला अशा फालतू कारणावरून उगाच मनस्ताप देण्यापेक्षा (एक तर स्वतः आधी उशीरा येऊन, सगळ्यांना उन्हामध्ये २ तास तिष्ठत ठेवलं होतं ) देऊन टाकली असती एक ३०० रू. ची प्रवेशिका तर काय बिघडलं असतं ? आता त्या नाही वाटत साठ वर्षांच्या यात त्यांची काय चूक ? मनस्ताप झाला खरा, पण त्या काही वाद नाही घालत बसल्या, शेवटी त्यांच्यासाठी हि एक ईनडायरेक्टली कॉम्प्लिमेंटच होती ना.. की "अजून तुम्ही तरूण दिसता वगैरे.." या बायका कधी कशा रीएक्ट होतील ब्रह्मदेवाच्या बापालाही सांगता येणार नाही. ....... असो.
तर हा माझा पहिला अनुभव होता, फ़ेस्टीवल सुरू होईल तेव्हा काय काय बघणं माझ्या नशिबात आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती.
शेवटी एकदाचा उद् घाटनाचा दिवस उजाडला. त्यादिवशी पासूनच खरी मजा यायला लागते. कारण गर्दी खेचण्यासाठी म्हणून बर्याचदा बडे फ़िल्मस्टार्स आणतात हे लोक. आणि कुठे काय बोलावं हे माहित नसल्याने इथे फ़ेस्टीवलमध्ये आल्यावर एकेकाची बौद्धिक झेप कळते. असं काही अगाध ज्ञान ते लोक पाझळतात की थक्क व्हायला होतं आणि प्रश्न पडतो की नक्की आपण ह्यांचेच चित्रपट बघतो का ? चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद लिहिणार्याच्या कर्तुत्त्वाची इथे आपल्याला जाणीव होते आणि त्यांचं कौतुक करावसं वाटतं... तसं जुन्या लोकांना आता हळूहळू जमायला लागलंय प्रेक्षकांशी आणि प्रसार माध्यमांशी संवाद साधणं वगैरे.. असो.
आता फ़ेस्टीवल सुरू झालेला असल्यामुळे एकेका गमती-जमतींना सुरूवात झालेली असते. कुणाला 'हवी असलेली' जागा बसायला मिळत नाही, मग तो ज्याला 'ती जागा' मिळाली आहे त्याला त्याचं समाधान लाभू देत नाही. फ़ॉरेन फ़िल्म्स् कॅटॅगरी मध्ये बर्याचशा फ़िल्म्स् मध्ये कधी कधी 'प्रौढांसाठी' चे सीन्स् असतात. त्यामुळे कुणी आपल्या मित्रांना फ़ेस्टिवलला खास 'तसले ' सीन्स् दाखवण्याकरता आणलेलं असतं. त्याची पण एक गम्मत आठवतेय मला, मल्टिप्लेक्स मध्ये एकाच वेळी ४-४ स्क्रीन्स वर फ़िल्म्स् चालू असतात, त्यामुळे नक्की कुठली फ़िल्म बघायची असा नेहमी गोंधळ होतो, अशातच एक उतावळा नमुना मागच्या वर्षी पहायला मिळाला, आम्ही ईटॅलियन फ़िल्म पहात होतो, आणि तो विचित्र मनुष्य दुसर्या स्क्रीनवरची फ़िल्म अर्धवट सोडून पटकन आमच्या इथे आला, आणि फोनवरून बाकीच्या मित्रांना बोलावत होता आमच्या स्क्रीन मध्ये..कारण त्याला त्याच्या कुणा एका मित्राने सांगितलं होतं (ज्याने हा चित्रपट आधी बघितलेला होता ) की, ती फ़िल्म सुरू झाल्यावर बरोब्बर ४५ मिनिटांनी आणि त्यानंतर २० मिनिटांनी असे दोन 'तसले ' सीन्स् आहेत आणि ते अगदी 'जमून' आलेयत. म्हणून तो बरोब्बर वेळेत आला होता... केवढी हि ओढ ? केवढी चित्रपटनिष्ठा ? आम्ही पुन्हा एकदा थक्क....!
एवढं करून ६० मिनिटं होऊन गेली तरी तो सीन येईना, म्हणून शेवटी तो वैतागला आणि घड्याळाकडे एक नजर टाकत, आमच्या स्क्रीनमधून धावत पळत दुसर्या स्क्रीनकडे पळाला, बहुतेक तिकडेही ह्याचं असंच कसलंतरी कॅल्क्युलेशन असणार... तो ईथून निघून गेला आणि ते दोन्ही सीन्स आले, आम्ही नेत्रं विस्फ़ारून ते पाहून घेतले ...खरंच जमून आले होते ते.. त्या बिचार्याचं दुर्दैव..... नक्कीच त्याचं घड्याळ बिघडलेलं असणार त्या दिवशी... कारण आमच्या ईथली फ़िल्म संपल्यावर जेव्हा आम्ही प्रेक्षागृहाच्या बाहेर आलो, तेव्हा तो दिसला आम्हाला....त्याचा चेहराच सांगत होता की त्याचे त्या फ़िल्म मधले सुद्धा 'ते' सीन्स बघायचे हुकले असणार... असे रग्गड नमुने आपल्याला फ़िल्म फ़ेस्टीवलमध्ये पहायला मिळतात.
फ़िल्म फ़ेस्टीवलबद्दल एक प्रचलित गैरसमज आहे की, तिथे फ़क्त ' प्रौढांसाठीचे च' किंवा बोअर , फ़्लॉप झालेले चित्रपट दाखवतात म्हणून.....पण तसं अजिबात नाहिये. ह्या गैरसमजाबद्दलचा सुद्धा एक किस्सा आहे, तो असा..
एक सद् गृहस्थ आपल्या फ़ॅमिलीला घेऊन फ़िल्म फ़ेस्टिवलला आले होते, त्यांनी एका तरूणांच्या चमूला विचारलं कि कुठले चित्रपट फ़ॅमिलीने बघण्याजोगे आहेत ? त्या तरूणांनी त्यांना सहकुटुंब-सहपरिवार , त्यादिवशीच्या खास " फ़क्त प्रौढांसाठीच" असलेल्या स्क्रीनमध्ये नेऊन बसवलं ... एकेक दृश्य समोर येताना त्या सद् गृहस्थांची काय अवस्था झालेली हे आख्ख्या प्रेक्षागृहाच्या नजरेतून लपलं नव्हतं , नंतर १० मिनिटांतच ते तिथून उठून निघून गेले...ते डायरेक्ट घरीच गेले असावेत.... कारण दिवसभरात कुठे दिसलेच नाहीत ते आम्हाला आख्ख्या मल्टिप्लेक्स मध्ये.... त्यामुळे तुमची अशी 'जाहीर फ़जिती' होऊ नये असं वाटत असेल तर सावध रहा.......
प्रत्येकाला इथे सगळ्या चित्रपटांची माहिती असलेलं माहितीपत्रक फ़ुकट मिळतं ते घ्यावं , किंवा मग चित्रपट सुरू व्हायच्या आधी प्रेक्षागृहाबाहेरच्या लोकांबरोबर ओळखी करून घ्यावात, त्यांना विचारावं की कुठले चित्रपट खरंच दर्जेदार आहेत, (अर्थात इथे तुमचं लक तुमच्या बरोबर असायला हवं की तुम्हाला योग्य व्यक्ती भेटेल आणि तिच्याकडून योग्य माहिती मिळेल ) .. मन पूर्वग्रहदूषित असेल तर तुम्हाला चित्रपटाचा निखळ आनंद उपभोगता येणार नाही.
ईथे सगळ्याच जॉनर मधले,सगळ्याच कॅटॅगरीमधले चित्रपट दाखवले जातात. कधी कधी तर आपण आपल्या रूटीन लाईफ़ मध्ये जे चित्रपट बघतो त्यापेक्षा 'जरा हटके' चित्रपट बघायला मिळतात, उच्च कोटीतले चित्रपट,दिग्दर्शकाची दृष्टी म्हणजे नेमकं काय, वगैरे हे सगळे आपल्याला ते चित्रपट बघितल्यावर कळतं. ईथे नेहमी येणारे जे लोक आहे, त्यांना शोधून (?) त्यांच्याशी ओळख करून घावी व ती वाढवावी, कारण कधी कधी फ़िल्म ईंडस्ट्रीमधल्या व्यक्तींकडे/संस्थांकडे सुद्धा मिळणार नाही अशी माहिती त्या लोकांकडे आपल्याला सचित्र स्वरूपात पहायला मिळते. आणि ते लोक ती माहिती कुणाशीही सहजासहजी शेअर करत नाहीत. ईथे डोकं चालवायला लागतं ती माहिती मिळवण्यासाठी... त्यातही वेगळीच मजा येते. ज्या लोकांना फ़िल्मलाईन मध्ये करीअर करायचं आहे त्यांनी तर जेवढे जास्त फ़िल्म फ़ेस्टिवल अटेंड करावेत तेवढं चांगलं . माझं स्वतः चं असं स्पष्ट मत आहे की, ज्याला एक परीपूर्ण ,प्रगल्भ आणि यशस्वी चित्रपट कारकीर्द करायची ईच्छा आहे त्याला हे फ़िल्म फ़ेस्टिवल्स् म्हणजे आयतं मिळालेलं ट्रेनिंग सेंटर आहे. (अर्थात् त्यासाठी एकलव्याचे गुण अंगी असायला हवेत, कारण तिथे तुम्हाला कुणी सांगायला येत नाही की, अमुक अमुक सीन कसा शूट केलाय, कॅमेरा आणि लाईट्स् कसे सेट केले आहेत, स्टुडिओ शॉट ला ईस्टॅब्लिश्ड शॉट चा ईफ़ेक्ट कसा आणलाय, वगैरे, वगैरे... ) त्यासाठी एक लहानशी डायरी आणि एक पेन जवळ ठेवावं, म्हणजे महत्त्वाची टिपणं लगेच टिपून घेता येतात.
ह्याच फ़िल्म फ़ेस्टीवलला एक 'रोमॅंटीक कॉर्नर' सुद्धा आहे, ईथे बर्याच जणांच्या 'जोड्या' जुळतात, एका फ़िल्म फ़ेस्टीवलमध्ये ओळख झाली की ती ओळ्ख वाढत जाते, म्ग पुन्हा दुसर्या कुठल्यातरी फ़िल्म फ़ेस्टीवलला भेट होते, असं करत करत नंतर मग , एकट्याने फ़ेस्टीवलला येणारे 'दुकटे' होऊन एकमेकांचा निरोप घेतात, (कधी कधी पुढच्या वर्षी तेच चेहरे आपल्याला पहायला मिळतात , फ़क्त त्यांचे पार्टनर्स बदललेले असतात.)
रूटीन लाईफ़ मध्ये फ़िल्म बघणं आणि फ़िल्म फ़ेस्टीवलमध्ये फ़िल्म बघणं यात तुलनाच करता येत नाही. घरी सुद्धा एखादा जुना चित्रपट बघताना क्वचित कंटाळाल्यासारखं होऊ शकेल, पण ईथे तसं कधीही होणार नाही. ईथे त्या चित्रपटात गुंग झालेली लोक पण पहायला मिळतात आणि तिथेच दुसरीकडे त्या चित्रपटावर कॉम्प्लीमेंट्स् पास करणारे टगे पण पहायला मिळतात, छान करमणूक होते.
तिथे येणार्या प्रत्येकाचे पोशाख सुद्धा कित्येकदा विचित्र असतात, खास करून तिथे येणार्या सगळ्या 'मॉड' आजीबाईंचे आणि आजोबांचे पोशाख, त्यांच्या अक्सेसरीज, अगदी धाडसाला दाद देण्याजोगं सगळं .... आमच्या आजी-आजोबांना कुणी हा अवतार दाखवू नका म्हणजे झालं....
आता थोडे वादाचे मुद्दे मांडतो...
जगात सर्वत्र फ़िल्म फ़ेस्टीवल्स् होतात, त्याबाबत बोलूच आपण, पण आपल्याकडे जे फ़िल्म फ़ेस्टीवल्स् होतात, त्याबद्दल बोलायचं तर , आयोजक नेहमी मल्टिप्लेक्स मध्येच चांगले ,दर्जेदार आणि विदेशी चित्रपट लावतात, आणि बाकिची जी ठिकाणं ठरवलेली असतात तिथे आपलेच जुने चित्रपट लावतात (जे चित्रपट केबल टि.व्ही. वर बघून बघून आपली त्याची पारायणं झालेली असतात), उदा. सांगायचं तर 'पुणे इंटरनॅशनल फ़िल्म फ़ेस्टीवलमध्ये' , पुण्यातल्या सगळ्या मल्टिप्लेक्स मध्ये जी मुख्य 'पुणे गाव' (म्हणजे स्वारगेट, किंवा महत्त्वाच्या पेठा ,वगैरे) परीसरापासून दूर आहेत, तिथे सगळे परदेशी आणि दर्जेदार चित्रपट आणि 'राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय ', 'गणेश कला-क्रीडा मंच' वगैरे ठिकाणी सगळे जुने भारतीय चित्रपट, असं का ? ईथल्या क्राऊडला सुद्धा परदेशी चित्रपट पहयचे असतात, त्यामुळे त्यांच्या सोईसाठी इथे सुद्धा परदेशी चित्रपट लावायला हवेत. फ़ेस्टीवल चालू असताना दररोज भाडं खर्च करून इतक्या लांब जाणं खिशाला परवडत नाही. आणि मल्टीप्लेक्स परीसरातील क्राऊड (आयनॉक्स, ई-स्क्वेअर, वगैरे) बर्यापैकी श्रीमंत आहे, आणि जसं आपल्याकडचा क्राऊड कायम भारतीय जुने चित्रपट बघत आलेला आहे, तसंच तो क्राऊड देखील कायम परदेशी चित्रपट बघणारा आहे. त्यामुळे उलट त्यांना भारतीय चित्रपट पहायला मिळावेत म्हणून तिथे तुम्ही भारतीय जुने चित्रपट लावा. आणि इथे परदेशी चित्रपट लावा. म्हणजे ज्याला जे रोजच बघायला मिळतं त्यापेक्षा काहितरी वेगळं बघायला मिळेल आणि 'फ़ेस्टीवल' या शब्दाचा खर्या अर्थाने त्यांना उपभोग घेता येईल. हाच मुद्द पुन्हा सोई-सुविधांसाठी सुद्धा मांडता येईल. त्या सगळ्यांना समान मिळायला हव्यात. परदेशी पाहुण्यांच आदरातिथ्य आपण करायला हवं , हे अगदी १०० % मान्य, पण त्यासाठी घरच्या पाहुण्यांना दुखावू नका.
अशाच अनेक आठवणी , भरमसाठ किस्से , चांगले-वाईट अनुभव, यातून बरंच काही शिकायला मिळतं, अगदीच काही नाही तरी एका वेगळ्या दुनियेत राहून आल्याचा आनंद मिळतो आणि तोच सर्वश्रेष्ठ असतो. कित्येक नवोदीत फ़िल्ममेकर्स आपली स्वप्नं घेऊन तिथे आलेले असतात. त्यातूनच एखाद्याला 'ब्रेक' मिळाला तर त्याच्या करीअरचा टर्निंग पॉईंट ठरतो. अशा उगवत्या कलाकारांच्या कलाकृती आपल्याला तिथे पहायला मिळतात. त्यामुळे मी तर म्हणेन की, सगळे गैरसमज मनातून काढून टाका, आणि मुक्त मनाने फ़िल्म फ़ेस्टीवलचा आस्वाद घ्या.

January 12, 2008 at 6:41 AM
mast re.....sahi aahe...hech aaste nemke...
maja aali vachun..!
January 12, 2008 at 10:43 AM
ब्लॉग सुंदर आहे. बहुतांशी मुद्दे मांडलेच आहेस. फक्त तु मांडलेल्या थोडाशा टीकेच्या मुद्द्यांचा परामर्श घ्यावासा वाटतोय.
वयाच्या मुद्द्याविषयी तु बोललायस, पण इथे खरी गोष्ट अशी आहे की वयाचे दाखले तपासायच्या सुचना, नियम व्यवस्थापन समिती ठरवते. तिकीटे देणार्यांना त्या पाळाव्या लागतात, म्हणुन जख्ख म्हातारीकडे सुध्दा वयाचा दाखला मागावा लागतो अन्यथा पुढच्या प्रश्नांना त्यांना तोंड द्यावे लागते.
चित्रपट महोत्सवांचा मुख्य उद्देश जरी उतमोत्तम चित्रपट दाखविणे असला तरी झालेला खर्च वसुल होणे अपेक्षित असते. म्हणुन ज्या त्या भागातील नागरीकांच्या आवडीनुसार चित्रपट दाखविणे भाग असते. व्यवसायिकतेच्या कसोटीवर यात काहीच चुक नाही. मग तु म्हणतोस तो 'प्रबोधनाचा' मुद्दा कागदावर कितीही चांगला वाटला तरी तो सत्यात उतरणे अशक्य आहे.
व्य्वस्थापनाबाबत बोलशील तर, चित्रपट महोत्सवांची संस्कृती अजुन येथे सर्वर्थाने रुजली नाही आहे. ऐन वेळच्या बर्याच अडचणी अनुभव घेतल्याशिवाय सुधारता येत नाहीत. म्हणुन जस जशी ही संस्कृती वाढत जाईल, तस तसे कटु अनुभव कमी होत जातील.
'आशियाई चित्रपट महोत्सवाच्या' व्यवस्थापन समितीबरोबर काम करताना पडद्यामागच्या या बर्याच गोष्टी अनुभवता आल्या. सामान्य माणसाला ज्या चुका वाटतात, त्यांमागची खरी कारणे जाणता आली, त्यातील काही येथे मांडण्याचा प्रयत्न केलाय
January 12, 2008 at 7:51 PM
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद !
@ सौरभ कर्णिक , तुझं म्हणणं सर्वाथाने पटतंय रे, पण चित्रपट महोत्सवाची संस्कृती तयार होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत जे दर्दी प्रेक्षक आहेत , ते यापासून दुरावत चालले आहेत. यावर उपाय म्हणजे चित्रपट महोत्सवाचे आयोजक,वगैरे मंडळींनी व्यवस्थित चर्चा करून असा काही मध्य साधावा जेणेकरून सामान्य माणसांना चित्रपट महोत्सवाचा निखळ आनंद उपभोगता येईल आणि व्यावसायिकतेच्या कसोटीवरही ते लोक खरे उतरू शकतील. आणि चित्रपट महोत्सवाची संस्कृती तयार करण्याचं काम हे तुमचं-आमचं आहे, आणि ते अशाच पद्धतीनेच आपण चालू ठेवायला हवं, आता मी ब्लॉगच्या माध्यमातून एक प्रकारच्या जनजागृतीला सुरूवात केलेली आहे. म्हणजे भविष्यात जेव्हा आमचे चित्रपट अशा महोत्सवात लागतील,तेव्हा आम्हाला रिकाम्या खुर्च्या बघाव्या लागू नयेत, म्हणून हा सगळा खटाटोप.
January 14, 2008 at 7:09 PM
छान झालय पोस्ट. सामान्य चित्रपट रसिकाच्या नजरेतून फ़ेस्टीवल ह्यापेक्षा वेगळा नक्कीच दिसू शकत नाही. नमुने विचित्र असतात हे खरेच. मात्र जरा नजर उघडी ठेवली, माहिती मनापासून मिळवली तर महोत्सवाचे रंग नक्कीच जास्त रंगतदार दिसतील. खरंतर मनापासून ज्यांना आस्वाद घ्यायचा आहे त्यांनी असे फ़ेस्टीवल्स अटेन्ड करायच्या आधी एखादा चित्रपट रसग्रहणाचा कोर्स केला तर नक्की फायदा होऊ शकतो. अजुनही खर्या अर्थाने हे फ़ेस्टीवल्स सामान्यजनांत रुळलेले नाहीत आणि योग्य नजर जोपर्यंत डेवलप झालेली नाही तोपर्यंत ते तसे रुळत नाहीयेत हे चांगलेच आहे. ती नजर तयार करण्याचे काम चित्रपट चळवळ चालवणारे आणि चित्रपट क्लब स्थापन करणारे ह्यासर्वांनी एक आव्हान म्हणून स्विकारायला हवं आहे.
मुंबईच्या चित्रपट महोत्सवांची तर्हा तर अजूनच मनोरंजक. सीझन झालाच आहे म्हणा सुरु. दिसत रहातीलच नमुने.
once again.. good post!
January 17, 2008 at 8:36 AM
जबरी. माझा पण पिफ चा हाच अनुभव आहे. ;)